कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

349

पुण्याकडे भरधाव वेगात जाणार्या कारने पुढे चाललेल्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार मारुती रामराव अंभोरे यांचा जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता हॉटेल गुरुदत्ता समोर चास शिवारात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती रामराव अंभोरे हे मोटारसायकलवरुन घराकडे जात असता नगरहून पुण्याकडे वेगात जाणाऱ्या अज्ञात कारने त्यांना धडक दिली. या धडकेत अंभोरे हे जखमी झाले. अपघात होताच कार चालक कारसह घटनास्थळावरुन पसार झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी वाघ यांना रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी रामराव अण्णासाहेब अंभोरे यांच्या फिर्यादीवरुन भा.दं. वि.क. 304 (अ) 279, 337, 338, 427 मोटारवाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो.ना. मरकड हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या