तुरुंगात कैद्याने केले महिला पोलिसाच्या गळयावर चाकूने वार

207

स्वयंपाक घरामधून चाकू घेऊन कारागृह येथे बंदोबस्तामध्ये असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या गळ्यावर एका इसमाने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता निवृत्ती शेळके उर्फ सुजाता गोपाल हाडवळे असं जखमी पोलीस कर्मचारीचे नाव आहे. या प्रकारामुळे पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता शेळके या कारागृहातील मेन गेट येथे त्यांच्या सहकार्‍यांसोबत बंदोबस्ताला होत्या. न्यायाधीन बंदी क्रमांक 107/ 2019 आरोपी पावलस कचरू गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेतला. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने शेळके यांचे डोक्याचे केस धरून गळ्यावर चाकूने वार केला. तो वार त्यांचे डाव्या हातावर झेलला असल्याने डाव्या हाताला दुखापत केली. कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. घडलेल्या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

या प्रकरणी महिला पोलीस सुजता शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गायकवाड याच्याविरुद्ध 307 353 यासह व विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ हे करत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या