नगरचं राजकारण एवढं सोपं नाही – रोहित पवार

2186
rohit-pawar-new

नगरचं राजकारण एवढं सोपं नाही. मी ते जवळून पाहिले आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. दरम्यान आजच्या झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राजश्री घुले व उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रतापदादा शेळके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर , करण ससाने, क्रांतिकारी पक्षाचे सुनील गडाख ,यावेळी उपस्थित होते.

‘जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझी राजकारणात सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे. नगरचे राजकारण सोपे नाही हे मी जवळून पाहिले आहे. पण मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येथील लोकांनी समजून घेतलं, मला स्वीकारलं, हा माझ्यासाठी मोठा अभिमान आहे .त्यामुळे आगामी काळामध्ये मागे काय झालं याच्या फंदात पडायचे नाही आगामी काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचे व विकास कामे करायचे यासाठी नियोजन करा,’ असा सल्लाही त्यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या