बैल घेऊन कत्तलखान्यात निघालेला ट्रक पोलिसांनी पकडला; चालकास अटक

659

कोपरगाव येथून ममदापूर तालुका राहता येथे कत्तलीसाठी घेऊन जाणारी सहा जनावरे कोपरगाव शहर पोलिसांनी बेट नाका इथे सोमवारी पकडली. तसेच जनावरांची अवैध वाहतूक करणारा चालक व आरोपी शाहरुख अन्वर शहा याला अटक करण्यात आली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस स्टेशनला असताना त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, कोपरगाव येथून कत्तलीसाठी काही जनावरे एका मॅक्स पिकअप मध्ये ममदापूर येथे नेहण्यात येणार आहेत. यानंतर पोलिसांनी रोडवर नाकाबंदी करून या पिकअप ट्रकला पाकडे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शाहरुख अन्वर शहा याला मॅक्स पिकअप व्हॅन, सहा बैल यासह दोन लाख 99 हजाराच्या मुद्देमालासह अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या