नागपूर-गडचिरोली महामार्गावर अपघात; पाचजण जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूर-गडचिरोली राज्य महामार्ग क्रमांक नऊवरील उदासाजवळील हेटी शिवारात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून नागपूरकडे जाणारी भरधाव ट्रॅव्हल्स बसने थांबलेल्या ट्रकवर आदळल्याने पाच जण जागीच ठार तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले़. हा अपघात मंगळवारी संध्याकाळी 8.30 वाजता झाला. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रक पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता़. त्याचा चालक व क्लिनर चाक बदलवत होते. त्यावेळी मागून आलेली ट्रॅव्हल्स बस ट्रकवर धडकली. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले़. मृतांमध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे़. रामदास मडावी( 55, रा़सिंदेवाही), कीर्ती चवरे(33, रा़ भिवापूर) या दोघांची नावे समजली आहेत. जखमींना उमेरड उपजिल्हा रुग्णालय तसेच गंभीर जखमींना नागपूर मेडीकल रुग्णालयात हलवण्यात आले़ आहे. अपघात इतका भयावह होता की ट्रॅव्हल्सच्या कॅबिनचा चुराडा झाला़.