
‘पेंचची राणी’, ‘कॉलरकाली वाघीण’, ‘टी-15’, ‘सुपरमॉम’ अशा विविध नावांनी विख्यात झालेल्या वाघिणीने अखेरचा श्वास घेतला. पेंच प्रकल्पातील राखीव जंगलात वार्धव्यामुळे तिचे निधन झाले. 29 बछडय़ांना जन्म देऊन ती सुपरमॉम ठरली होती. कन्यप्रेमीही तिच्या निधनाने हळहळले. साश्रूनयनांनी तिला अखेरचा निरोप देण्यात आला.
वाघाचे आयुष्यमान साधारणपणे 12 वर्षे असते. परंतु या कॉलरवाल्या वाघिणीचे वय 17 वर्षे होते. 2008 ते 2019 या अकरा वर्षांत 29 बछडय़ांना जन्म देऊन ती ‘सुपरमॉम’ ठरली होती. त्यापैकी 25 बछडे जिवंत असल्याचे वन अधिकाऱयांनी सांगितले. वर्धव्यामुळे ही वाघीण अशक्त झाली होती. 14 जानेवारीला पर्यटकांना ती शेवटची दिसली होती.

























































