
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे. त्याचसोबत विविध कामांच्या संदर्भात अनेक दौरे करावे लागले. या दरम्यान मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे मी माझी कोरोनाची चाचणी करून घेतली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे. आपण काळजी करू नये. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन असे नाना पटोले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



























































