देशाला स्मशानभूमी करणाऱया मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस फडणवीसांनी दाखवावे

देशात रोज 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी पेंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा जबाबदार आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणाऱया नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील कोरोनाविषयी सोनिया गांधी यांना पत्र पाठवणाऱया देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोले यांनी जोरदार शब्दांत समाचार घेतला. कोरोनाचा संसर्ग रोखणाऱया मुंबई मॉडेलचे कौतुक करणारे पेंद्र सरकार व निती आयोग खोटे बोलत आहेत आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला.

देशातील जनता रेमडेसिवीर मागत असताना भाजपचे नेते रेमडेसिवीरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते. काळाबाजार करणाऱया पंपनीच्या लोकांना वाचविण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घालत होते. रेमडेसिवीर साठेबाजीप्रकरणी नगरच्या भाजप खासदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत याकडे नाना पटोले यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. 70 वर्षांत कधी हिंदुस्थानची झाली नव्हती एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहारमध्ये कोरोना मृत्यू लपवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने निर्दयीपणे मृतदेह पुरले जात आहेत तर हजारो मृतदेह गंगा नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत. हे विदारक चित्र जग उघडय़ा डोळ्यांनी पाहत आहे अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या