
कोरोना विषाणू संसर्गामुळे आज आठ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ४२० एवढी झाली आहे. आज १४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १६१९९ एवढी झाली आहे.
आज गवळीपूरा नांदेड येथील २७ वर्षीय महिला, बजरंगनगर नांदेड येथील ६८ वर्षीय पुरुष, भोकर येथील ७० वर्षीय पुरुष, वसरणी नांदेड येथील ६० वर्षीय पुरुष, नाथनगर नांदेड येथील ८३ वर्षीय महिला, इंदिरानगर नांदेड येथील ६५ वर्षीय पुरुष, हडको नांदेड येथील ७० वर्षीय पुरुष, सोमेश कॉलनी नांदेड येथील ८६ वर्षीय महिला अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज ६५१ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ५०१ जणांचे रिपोट निगेटीव्ह आले आहेत तर आज १४० रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले असून त्यामुळे एवूâण रुग्णसंख्या १६१९९ वर पोहोचली आहे.
आज नांदेड महापालिका क्षेत्रात ८२, भोकर १, उमरी २, यवतमाळ २, नांदेड ग्रामीण ३, कंधार ९, संभाजीनगर १, अर्धापूर १३, बिलोली १, धर्माबाद ४, देगलूर ६, वाशिम १, मुदखेड १, नायगाव २, माहूर १, लोहा ४, किनवट ५, उमरी १, हिंगोली १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज १५४ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १२५४५ एवढी झाली आहे. आता वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून ३१३५ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ३३ जणांची प्रकृती गंभीर आहे.



























































