
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने आज पुन्हा डोकेवर काढत नवा उच्चांक गाठला असून आज ४४३ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ७८५० वर पोहोचली आहे. आज आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या २५१ वर गेली आहे.
आज वैलमपूरा ता.किनवट येथील ७० वर्षीय महिला, जुनामोंढा नांदेड येथील ७५ वर्षीय पुरुष, आक्सा कॉलनी नांदेड येथील ४५ वर्षीय पुरुष, गोकुळनगर नांदेड येथील ७५ वर्षीय पुरुष, बोधडी ता.किनवट येथील ४७ वर्षीय महिला, लोहा येथील ७० वर्षीय पुरुष, बोरबन परिसरातील ८१ वर्षीय पुरुष आणि औराळ ता.वंâधार येथील ५२ वर्षीय पुरुष अशा आठ जणांचा आज कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यू झाला. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा २५१ वर पोहोचला आहे.
आज १८०९ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासल्या गेले त्यातील १२९७ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तर ४४३ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या ७८५० वर पोहोचली आहे. आज नांदेड मनपा क्षेत्रात २३८, किनवट १४, भोकर ५, लोहा ३७, नायगाव ५, वंâधार १०, माहूर १०, अर्धापूर १५, हदगाव १४, देगलूर ३, मुखेड १८, हिंगोली ३, लातूर १, परभणी ६, यवतमाळ २, मुंबई १, उमरी ४, धर्माबाद ८, हिमायतनगर १ अशा ४४३ रुग्णांचा यात समावेश आहे.
आज २२४ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली त्यामुळै बरे होवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ५००१ एवढी झाली आहे. आता नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये २५४४ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी २४६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.































































