
कंधारमध्ये दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. रविवारी अवकाळी पावसाने वाऱ्यसह हजेरी लावली. तर सोमवारी पावसासह गाराने हजेरी लावली. अगोदरच कारोनाने हतबल झालेला शेतकरी गारांसह पावसाने होत ते शेतातील घालून बसला अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.
दोन तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. पाऊस पडेल असे बोलले जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास वारा व ढगगर्जेनेने पावसाने हजेरी लावली. पण आज मात्र शहरात पावसाने तर शहरापासून जवळच असलेल्या फुलवळ,आंबुलगा, गऊळ, वाखरड, बोरी,हरबळ, कंधारे वाडी, पानशेवडी, बाचोटी, केवलातांडा,महादेवतांडा, गारांसह अवकाळी पावसाने उपस्थिती दिली. अगोदरच कारोनाने हतबल झालेला शेतकरी गारांसह पावसाने पुन्हा एकदा हैराण झाला आहे. फुलवळ परिसरात भाजीपाल्याचे उत्पादन जास्त आहे. त्यांचे बरेच नुकसान झाले आहे. आताच झालेल्या भयानक वादळामुळे काशीराम तांडा येथील घरावरील पत्रे उडुन गेली. हवेचा वेग एवढा होता की अक्षरशः नागरिक जिव मुठीत घेऊन थांबले होते .घराबाहेर बांधलेल्या गुरा ढोरांना मार लागलेला आहे – स्वप्निल रामराव राठोड यांनी माहीती दिली आहे































































