मुंबईत श्री देव कोळंबा जत्रोत्सव उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाचा जत्रोत्सव डिलाईल रोड येथील श्रमिक जिमखान्याजवळील ना. म. जोशी पालिका शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शिंदे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नांदगाव विकास मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यावेळी सिंधुदुर्ग जिह्यातून दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. 99.40 टक्के मिळवणाऱया आर्यन मोरये यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संध्याकाळी संपूर्ण नांदगावकरांच्यावतीने सामूहिक गा-हाणे घालण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मुंबईतील नांदगावकरवासीयांनी हजेरी लावून श्री देव कोळंबाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, सरचिटणीस राजेंद्र मोरये, खजिनदार रवींद्र रेवडेकर, सहखजिनदार सतीश मोरये, शशिकांत रेवडेकर, सूर्यकांत रेवडेकर, वैशाली आयरे, गोविंद हळदणकर उपस्थित हेते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.