नारायण मूर्ती यांच्या चार महिन्यांचा नातवाची पहिली कमाई 4 कोटी रुपयांची

इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचा चार महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्ती या नातवाची संपत्ती 210 कोटी रुपये आहे. सहा महिने पूर्ण केल्यानंतर त्याची पहिली कमाई चार कोटी रुपये होणार आहे. इन्फोसिसकडून पहिला डिविडंड 4 कोटी रुपये मिळणार आहे. इन्फोसिसच्या शेअरची व्हॅल्यू जवळपास 1400 रुपये आहे. हा डिविडंड 1 जुलै रोजी दिला जाणार आहे. नारायण मूर्ती यांनी आपल्या नातवाला 15 लाख शेअर गिफ्ट म्हणून दिले आहेत. एकाग्रला 4.2 कोटी रुपयांचे इन्फोसिसचे डिविडंड म्हणून मिळणार आहे.