
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण चिवला समुद्रकिनाऱयावरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाकडून यासंदर्भात आदेश देण्यात आल्याचे समजते.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणेंच्या मालवण येथील नीलरत्न बंगला बांधत असताना सीआरझेड-2चे उल्लंघन झाले असल्याची तक्रार ऑगस्ट 2021ला केली होती. यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश बंगल्याला नोटीस बजावली होती. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या अधिकाऱयांकडून बंगल्याची पाहणी आणि मोजमाप केले जाण्याची शक्यता आहे.



























































