नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतून दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेशन विभाग अर्थात सीबीआयने मुंबईतून दोघांना अटक केली आहे. अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने शनिवारी अटक केली आहे. दोघांना उद्या सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे.

याआधी सीबीआयने दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला अटक आली होती. सचिन अणधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला संभाजीनगरमधील संभाजीपेठेतून अटक करण्यात आली होती. त्याआधी दाभोळकर हत्ये प्रकरणी वीरेंद्र तावड़े याला अटक करण्यात आली होती. आता मुंबईतून दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत सीबीआयने वीरेंद्र तावड़े, सचिन अणधुरे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली आहे.