मोदी सरकारने प्रसिद्धीवर उधळले 3 हजार कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2017 पासून आतापर्यंतच्या पाच वर्षांत प्रसिद्धीसाठी जाहिरातींवर तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. 2017-18 ते 12 जुलै 2022 या कालावधीत प्रिन्ट मिडियामध्ये जाहिराती देण्यासाठी मोदी सरकारने 1756.48 कोटी रुपये तर इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये जाहिराती देण्यासाठी 1583.01 कोटी रुपये खर्च केले.

परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती देण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय किंवा अन्य कोणत्याही सरकारी विभागाने खर्च केलेला नाही असे ठाकूर यांनी सांगितले.