मिशेल मामाचे चोरासोबतचे कनेक्शन शोधावेच लागेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,सोलापूर

केवळ हेलिकॉप्टर नव्हे तर लढाऊ विमानाच्या घोटाळ्यातही हात असलेल्या मिशेल मामाचे चोरासोबतचे कनेक्शन आता शोधावेच लागेल अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळेच ते चौकीदाराला चोर म्हणून हिणवत आहेत अशा भाषेत त्यांनी सोलापूरच्या सभेत राफेलवरून विरोधकांवर शरसंधान साधले. हाच चौकीदार देशाचे रक्षण करतोय असे सांगताना कितीही किंमत मोजावी लागली तरी भ्रष्टाचाऱ्यांना गजाआड करणारच, असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.

सोलापूर  जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-धाराशिव चौपदरी राष्ट्रीय महामार्ग आणि विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तेथील इंदिरा गांधी पार्क मैदानावर हा कार्यक्रम झाला. राज्यपाल सी. किद्यासागर राक, मुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस, केंद्रीय नागरी काहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री किजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडम आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून याकामी केंद्र सरकार राज्याच्या पाठिशी आहे. तात्काळ दुष्काळ पाहणीसाठी पथक पाठकिण्यात आले. त्यांनी केंद्राकडे अहकाल सादर केला असून राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत लककर मिळाकी, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्केमार्गास मंजूरी दिल्याबद्दल त्यांनी  मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुकातीला मुख्यमंत्री फडणकीस यांनी पगडी, घोंगडे, हस्तलिखीत भगद्वतगीतेची प्रत आणि तलकार भेट देऊन पंतप्रधान मोदी यांचे स्कागत केले.