Video – पंडित नेहरू जननायक, पंतप्रधान मोदींकडून गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचे जननायक आणि आधुनिक हिंदुस्थानचे शिल्पकार होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्या कार्याचा गौरव केला.

देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळय़ाचा शुभारंभ करताना महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर या महान नेत्यांच्या कार्याचा  पंतप्रधानांनी गौरव केला.  स्वातंत्र्यलढय़ानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक हिंदुस्थानचा पाया रचला. देशाला दूरदर्शी नेतृत्व देणाऱया पंडितजींचे योगदान अविस्मरणीयच आहे, असेही मोदी म्हणाले.