बिग बी यांनी सांगितले, ‘नसीब’च्या क्लायमॅक्सचे गुपीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नसीब’ हा महानायक अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट. 1981 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील क्लायमॅक्स सीनची आजही चर्चा होते. परंतु त्या वेळी व्हीएफएक्स नसल्याने हा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी कशा प्रकारे शक्कल लढवली होती, याचे गुपित तब्बल 40 वर्षांनी महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे.

चित्रपटातील एक फोटो पोस्ट करत बिग बी म्हणाले, ‘‘नसीब चित्रपटातील क्लायमॅक्सचे चांदिवली येथील एका स्टुडियोत शूट करण्यात आले होते. या स्टुडिओत एक गेमिंग रेस्तरॉ तयार केले. यात क्लायमॅक्स सीनसाठी एक फिरता सेट तयार केला होता. आज तो सीन पाहिला की स्पेशल इफेक्ट केल्याचा भास होतो. व्हीएफएक्स, सीजी असा कोणताही प्रकार त्या वेळी नव्हता. ग्रेट मनमोहन देसाईच अशा प्रकारे विचार करू शकतात आणि सीन यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात. ते दिवस वेगळेच होते मित्रांनो.’’ बिग बी यांचा हा किस्सा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.