माझ्या रक्तात ‘हिंदुस्थान’ आहे, अनुपम खेर यांचे नसरुद्दीन शहांना प्रत्युत्तर

800

अभिनेते अनुपम खेर नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) या विषयावर पुढाकार घेत आहेत. मला विचाराल तर ते एक विदुषक आणि मनोरुग्ण आहेत. हा त्यांच्या रक्तातला गुण आहे, असे विधान करणाऱ्या नसरुद्दीन शहा यांना अभिनेते अनुपम खेर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) कायद्याविरोधात मत व्यक्त करताना अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी हे विधान केले होते.

नसरुद्दीन शहा यांना प्रत्युत्तर देताना अनुपम खेर म्हणाले की, मी त्यांच्या वक्तव्यांना गंभीरतेने घेत नाही. मी कधीही त्यांच्याबाबत चुकीचे उद्गार काढलेले नाही. परंतु आता एक सांगतो की, तुम्ही (नसरुद्दीन शहा) चित्रपटक्षेत्रामध्ये यशाचे शिखर गाठूनही आपले संपूर्ण आयुष्य निराशेत घालवले आहे. दीलिप कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शाहरुख खान आणि विराट कोहलीसारख्या लोकांचे तुम्ही मुल्यमापन करत असाल तर मला त्यांच्या रांगेमध्ये उभे केल्याबद्दल धन्यवाद. यातील एकानाही तुमच्या वक्तव्याला गंभीरतेने घेतले नाही. कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे की हे तुम्ही अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करत आहात त्यामुळे तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य आहे यातील फरक कळत नाही, असेही खेर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, माझ्याबाबत वाईट बोलून जर तुम्ही एक दोन दिवस प्रसिद्धी मिळवत असाल तर हे माझ्याकडून तुम्हाला बक्षिस आहे असे समजा. देव तुम्हाला आनंदात ठेऊ आणि हो माझ्या रक्तामध्ये हिंदुस्थान आहे, असा टोलाही खेर यांनी लगावला.

काय म्हणाले होते नसरुद्दीन शहा?
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसरुद्दीन शहा यांनी सीएए आणि एनआरसीवर आपली भूमिका व्यक्त करताना म्हटले की, ‘स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही लोकांना या देशाचे नागरीक आहे हे सिद्ध करावे लागत असेल तर हे चुकीचे आहे. अनुपम खेर या बाबतीत खूप पुढाकार घेत आहेत, मात्र मला नाही वाटत त्यांना जास्त गंभीरतेने घ्यायला हवे. ते एक विदुषक, मनोरुग्ण आहेत. हा त्यांच्या रक्तातील गुण आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या