बागलाण तालुक्यातील कोरोना रुग्णांची, संख्या उतरणीला 16 पैकी एकही हॉटस्पॉट नाही

बागलाण तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या उतरणीला लागली असून तालुक्यातील 16 हॉटस्पॉटपैकी सद्यस्थितीत एकही हॉटस्पॉट उरलेला नाही. तालुक्यात आजमितीस अवघे 132 कोरोनाबाधित असून सर्वाधिक संख्या 23 ही सटाणा शहरातील असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. आजमितीस तालुक्यातील 49 गावांमध्ये मिळून अवघे 109 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर तालुक्यातील 120 गावांत आज एकही रुग्ण नाही.  तालुक्यात 16 हॉटस्पॉट केंद्रे निश्चित करण्यात आली होती, मात्र सद्यस्थितीत एकही हॉटस्पॉट नसल्याने ही समाधानाची बाब आहे. सटाणा शहरातील कोरोनाबाधितांची संख्यादेखील कमी झाली आहे.

आज अखेर अवघे 23 रुग्ण सटाणा शहरात उपचार घेत आहेत. कोविड रुग्ण कमी असले तरीही गावागावातील बाधितांनी गरज भासल्यास कोविड सेंटरमध्येच उपचारासाठी दाखल व्हावे, घरात थांबून उपचार करू नये.  – डॉ. हेमंत अहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी

आपली प्रतिक्रिया द्या