तोरणमाळजवळ बोलेरो उलटून दोन भावीक ठार, चार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ रस्त्यावर आज पहाटे बोलेरो उलटून दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी असून, त्यांच्यावर नंदुरबार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आठ जण बोलेरोने तोरणमाळ येथे महाशिवरात्री उत्सवासाठी गेले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास सात पायरी घाटात उतारावर चालकाचे नियंत्रण सुटून बोलेरो उलटली. यात शिरपूर तालुक्यातील दोंडवाला येथील तुळशीराम आलशा पावरा (42) व अंबाखंबाला येथील गुरुलाल सखाराम पावरा (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सैंधवा येथील मेनकाबाई सुनील पावरा (25), रोहिणी येथील सुंदरलाल गल्या पावरा (25), साक्षी गोविंदा पावरा (30) व अंबाखंबाला येथील चालक जितेश भिकला पावरा (16) जखमी असून, त्यांच्यावर नंदुरबार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती म्हसावद पोलिसांनी दिली.