नाशिकचा संस्कारी चिमुरडा होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर 14 महिन्याच्या चिमुरडय़ाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय. राघव चेतन पाटील असे मुलाचे नाव असून तो नाशिकचा आहे. त्याचे याआधीही काही व्हिडीओ हिट झाले आहेत. त्यामुळे राघव नेटिजन्सच्या कौतुकाचा विषय आहे.

त्याच्या नव्या व्हिडीआवर तर सारेच खूश झाले आहेत. घराबाहेर पडताना मोठय़ांचा आशीर्वाद घेणे ही आपली संस्कृती आहे. तसेच कोरोनाच्या काळात मास्क घालणे किंवा सॅनिटायझर वापरणं ही काळाची गरज आहे. व्हिडीओत राघव या दोन्ही गोष्टींचे पालन करताना दिसत आहे. इतक्या लहान वयातील राघवची समज बघून सारेच थक्क होत आहेत.