गिझरच्या भीषण स्फोटात बालकासह तिघे गंभीर जखमी, नाशिकमधील दुर्घटना

खुटवडनगरच्या धनदाई कॉलनीतील बंगल्यात सोमवारी सकाळी गॅस गळतीमुळे गिझरच्या भीषण स्फोट झाला यात तिघेजण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोनवर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. स्फोटाच्या हादऱ्याने एक भिंत पडली, तर इतर भिंतींना तडे गेले, दारे, खिडक्या, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

धनदाई कॉलनीत बळीराम मुरलीधर पगार (56) यांचा देवकी बंगला आहे. येथे सकाळी सातच्या सुमारास अचानक मोठा आवाज होवून आगीचा भडका उडाला. नागरिकांनी स्फोटात जखमी झालेल्या बळीराम पगार, पत्नी पुष्पावती (50) यांना उपचारासाठी सुखकर्ता हॉस्पिटलमध्ये हलविले. पुष्पावती 80 टक्के, तर बळीराम पगार 45 टक्के भाजले आहेत. त्यांचा नातू रोहन ज्ञानेश्वर शिरसाठ (2) हाही 30 ते 35 टक्के भाजला असून, त्याच्यावर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या