दहावीच्या परीक्षेला दहा कॉपीबहाद्दर, जळगावच्या केंद्र संचालकाविरुद्ध कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भाषा विषयाच्या परीक्षेला विभागात दहा कॉपीबहाद्दर आढळले आहेत. जळगावच्या फैजपूर येथील एका परीक्षा केंद्रात तब्बल पाच कॉपी प्रकरणे झाल्यामुळे संबंधित केंद्र संचालकावर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिली.

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातून एकूण 2 लाख 16 हजार 444 विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देत आहेत. विभागातील 445 केंद्रांवर मंगळवारी सकाळी मराठीसह इतर भाषांची लेखी परीक्षा पार पडली. नाशिक जिल्ह्यात आज पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळला नाही. जळगावला सर्वाधिक 5, नंदुरबारला 4, तर धुळे येथे एक विद्यार्थी कॉपी करताना आढळला.

आम्ही हरलेलो नाही, आमची जिद्द कायम! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींनी दिली SSCची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील एका परीक्षा केंद्रावर आज पाच कॉपी प्रकरणे निदर्शनास आली आहेत. याप्रकरणी संबंधित केंद्र संचालकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.