
सामना प्रतिनिधी। नाशिक
नाशिकच्या पेठरोड भागात सोमवारी रात्री गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसांसह तिघांना अटक करण्यात आली. यात एका पोलीस कर्मचाऱयाच्या मुलाचा समावेश आहे.
पंचवटी पोलिसांच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पेठरोडवरील शनी मंदिरासमोर अयोध्यानगरीतील अनिकेत राजेश निंबाळकर (23), जत्रा हॉटेल येथील संकेत प्रकाश इंगळे व निफाड तालुक्यातील पिंपळगाव-बसवंत पोलीस वसाहतीत राहणारा तेजस नंदकिशोर जाधव (24) हे एकाच दुचाकीवरून आले होते. त्यांची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीत गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आढळली.
.

































































