नाशिक- तत्काळ आरोग्य सेवेसाठी सर्च अॅप मदतीला, सिन्नरला प्रायोगिक तत्त्वावर वापर

455

कोरोनाच्या संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने गंभीर आजारांनी त्रस्त रूग्णांना त्वरित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सच अॅप तयार केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर सिन्नर तालुक्यात सुरू झाला आहे.

या अॅपचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती शोभा बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर उपस्थित होते.

विविध आजारांनी बाधित रुग्णाला कोविडचा धोका जास्त असल्याने अशा रुग्णांना आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यास या अॅपद्वारे मदत होणार आहे. याचा सिन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आला आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन संपूर्ण जिल्ह्यात जनतेच्या सेवेसाठी वापर सुरू करण्यात येणार आहे. हे अॅप विकसित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत निधी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या