नाशिकच्या प्रमोद यांची ‘श्यामालहरी’, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य रांगोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्हय़ातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापूर्वी त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून अनेक कलापृती साकारल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या भव्य रांगोळीचे शीर्षकही त्यांनी ‘श्यामालहरी’ असे ठेवले आहे.

प्रमोद आर्वी गेल्या नऊ वर्षांपासून रांगोळी कलेचे मार्गदर्शन करत आहेत. आजवर त्यांनी लहानमोठय़ा मुलांना चित्रकला आणि रांगोळीचे प्रशिक्षण दिले आहे. प्रमोद यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची 4.5 बाय 6 फुटाची रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी त्यांना 48 तास लागले आहेत.

रांगोळी कला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. रांगोळीत अनेक सामाजिक, राजकीय व समाजप्रबोधनपर विषय मांडता येतात. आज रांगोळी कलेने मोठे शिखर गाठले आहे. गानकोकिळा लतादीदी यांची रांगोळी काढण्याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. अखेर हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे.
– प्रमोद आर्वी, रांगोळी कलाकार