
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील बल्लू पुलाजवळ भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनामुळे बसवर ढिगारा कोसळून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्यांना वाचवण्याचे कार्य करत आहेत.
बसमध्ये 30 प्रवासी असल्याची माहिती मिळते. स्थानिक रहिवासी देखील मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. बचाव कार्य रात्रभर सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बसमध्ये अडकलेल्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.