
भाजप नेत्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी ओडिशात घडली. पीताबाश पांडा असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. पांडा यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पांडा यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ओडिशातील ब्रह्मनगर भागात पांडा यांच्या घराजवळच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पांडा यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पिताबाश हे भाजप सदस्य तसेच ज्येष्ठ वकील आणि आरटीआय कार्यकर्ते होते.