लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट; आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, दिल्लीत हाय अलर्ट जारी

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर परिसरातील तीन कारना भीषण आग लागली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

स्फोटामुळे जवळ पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोटामुळे जवळील पथदिवेही जळून खाक झाले. स्फोटावेळी परिसरात वर्दळ होती. दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

स्फोटाचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक, फॉरेन्सिक टीम आणि तांत्रिक तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, स्फोटानंतर जवळील चांदणी चौक बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. लाल किल्ल्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)