
चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेली कमानी कोसळल्याने 9 कामगारांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी उत्तर चेन्नईतील स्टॅनली सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 30 फूट उंचीवरून कमानी कामगारांवर कोसळली. अचानक झालेल्या या अपघातामुळे घटनास्थळी घबराटीचे वातावरण पसरले. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनेचा तपास सुरू आहे.