सुरक्षा त्रुटी भोवली, बंगळुरूमधील सहा पोलीस निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी बंगळुरूमध्ये ताफ्यासाठी राखीव असलेल्या महामार्गावर जिलेटीनच्या कांड्या आणि काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत एका उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. यामध्ये एक सब-इन्स्पेक्टर, एक असिस्टंट सब-इन्स्पेक्टर आणि चार कॉन्स्टेबल अशा एकूण सहा जणांना निलंबित केले आहे.