काँग्रेसची जोरदार मुसंडी; मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सत्ता येणार, राजस्थान, तेलंगणात चुरस कायम

आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. आता या पाचही राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून 3 डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. आता या पाच राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत. या पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

या विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसने या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपला जबरदस्त टक्कर देत आहे. तसेच तेलंगणामध्येही बीआरएसला फटका बसणार असून काँग्रस जबरदस्त आघाडी घेण्याची शक्यता आहे. तर मिझोराममध्ये जोरम पीपुल मूवमेंटला (जेपीएम) सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये 200, मध्य प्रदेशात 230, तेलंगणात 119, छत्तीसगडमध्ये 90 आणि मिझोराममध्ये 40 विधआनसभेच्या जागेसाठी मतदान झाले आहे. याबाबत विविध एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज पाहूया.

राजस्थान

टाईम्स नाऊ-ईटीजी एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 108 ते 128 जागा
काँग्रेस 56 ते 72 जागा

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 100 ते 110 जागा
काँग्रेस 90 ते 100 जागा

जन की बात एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 100 ते 122 जागा
काँग्रेस 62 ते 85 जागा

मध्य प्रदेश

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिझ एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 118 ते 130 जागा
काँग्रेस 97 ते 107 जागा

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 106 ते 116 जागा
काँग्रेस 111 ते 121जागा

जन की बात एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 100 ते 123 जागा
काँग्रेस 102 ते 125 जागा

छत्तीसगड

जन की बात एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 34 ते 45 जागा
काँग्रेस 42 ते 53 जागा

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 30 ते 40 जागा
काँग्रेस 46 ते 56 जागा

एबीपी न्यूज-सी वोटर एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 36 ते 48 जागा
काँग्रेस 41 ते 53 जागा

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 36 ते 46 जागा
काँग्रेस 40 ते 50 जागा

तेलंगणा

जन की बातच्या एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 7 ते 13 जागा
काँग्रेस 48 ते 64 जागा
बीआरएस 40 ते 55 जागा

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलचा अंदाज
भाजप 5 ते 10 जागा
काँग्रेस 48 ते 58 जागा
बीआरएस 49 ते 59 जागा
एमआयएम 6 ते 8 जागा

मिझोराम

जन की बात एक्झिट पोलचा अंदाज

एमएनएफ 12 जागा
जेपीएम 20 जागा
भाजप 1 जागा
काँग्रेस 7 जागा