सिडको सफाई कामगारांना अल्प दरात घरे द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। न्हावा शेवा

नवी मुंबई भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून सिडकोमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना कमीत कमी किमतीत घरे तसेच इतर सुविधा मिळाव्यात अशी मागणी नवी मुंबई भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सुरेश पाटील यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको कार्यलयात भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, सिडको सफाई कामगारांना कमीतकमी किमतीत घरे देण्याचा निर्णय तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मान्य केला होता. त्याची अमलबजावणी करून आगामी घरांच्या सोडतीमधून त्याचे वाटप करावे, नवी मुंबई भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून सिडकोमध्ये ठेकेदार पद्धतीने जवळपास 25 वर्षे काम करीत असून या कामगारांना सिडकोमध्ये समाविष्ट करून कायमस्वरूपी नोकरी द्यावी, सामान काम समान वेतन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून सिडको सिडको कायस्वरूपी कामगारांप्रमाणे वेतन मिळावे, सिडकोमध्ये जमा असलेली 4 टक्के ग्रॅज्युइटीची रक्कम निवृत्त झालेल्या कामगारांना त्वरित मिळावी, त्याचबरोबर सिडको कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस, रजा, गणवेश मिळावेत, अशीही मागणी निवेदनाद्वारे सुरेश पाटील यांनी केली आहे.