नेरुळमध्ये बिल्डरची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

नवी मुंबईतील नेरुळमध्ये एका बिल्डरची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सावजीभाई पटेल असे त्या बिल्डरचे नाव असून ते इम्परिया ग्रुपशी संबंधित असल्याचे समजते.

सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सावजीभाई त्यांच्या गाडीतून जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा गाडीतच मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.