
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्ध यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे.
‘राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल’, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे याआधी 2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच वाक्याचा हवाला देत सिद्धूंनी मोदींवर टीका केली होती.
राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख लेI
Punjabi Translation :
ਰਾਜਾ ਐਨਾ ਵੀ ਫ਼ਕੀਰ ਨਾ ਚੁਣੋ ਕਿ ਕੋਈ ਵੀ ਵਪਾਰੀ ਉਸਨੂੰ ਆਪਣੀ ਜੇਬ ‘ਚ ਪਾਈ ਫਿਰੇ।— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 23, 2020
सिद्ध यांनी याआधी एप्रिल 2019 मध्य़े सेम ट्वीट केले होते. या ट्विटसोबत त्यांनी उद्योजक अनिक अंबानी, मुकेश अंबानी यांचे मोदींसोबतचे फोटोही शेअर केले होते. त्यावेळीही त्यांनी ‘राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख ले’, हे कॅप्शन या ट्वीटला दिले होते. आता शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिद्ध यांनी पुन्हा एकदा मोदींवर तसेच ट्वीट करत निशाणा साधला आहे.
राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख ले ~ आचार्य चाणक्य (Chanakya) pic.twitter.com/HIFnf03Akb
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) April 27, 2019
शेतकरी कायदा मागे घेण्याच्या मागणीवर ठाम
दरम्यान, कृषी कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात पाच ते सहा वेळा चर्चाही झाली. केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची आणि प्रत्येक कलमावर चर्चा करण्याचीही तयारी दाखवली. मात्र शेतकरी कायदा मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.





























































