
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) ही लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) तिने लग्नाचा बार उडवून दिला आहे. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.
नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या लग्नाला बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. रजनीकांत, शाहरूख खान, विजय सेतुपती, बोनी कपूर आणि थलापती विजय यांच्यासह अनेक सेलेब्रिटी या लग्नाला हजर होते. रजनीकांत यांनी आपल्या हाताने मंगळसुत्र विग्नेश शिवन याच्या हाती दिले आणि त्याने ते नयनतारा हिच्या गळ्यामध्ये घातले.
View this post on Instagram
विग्नेश शिवन यानेही आपल्या ट्विटर हँडलवरून विवाहसोहळ्याचा फोटो शेअर केला आहे. यात विग्नेश नववधु नयनतारा हिच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसतोय. देवाच्या कृपेने आणि पालक, मित्रांच्या आशीर्वादाने नयनतारा हिच्याशी लग्न केलेय, असे कॅप्शन विग्नेश याने या फोटोसोबत दिले आहे.
On a scale of 10…
She’s Nayan & am the One ☝️☺️😍🥰
With God’s grace , the universe , all the blessings of our parents & best of friends
Jus married #Nayanthara ☺️😍🥰 #WikkiNayan #wikkinayanwedding pic.twitter.com/C7ySe17i8F
— Vignesh Shivan (@VigneshShivN) June 9, 2022
लग्नामध्ये नयनतारा हिने लाल रंगाची साडी घातली होती. यात ती खूपच सुंदर दिसतेय. सोबतच तिने अंगावर भरजरी दागिनेही घातले होते. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. यासह सेलेब्रिटीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
सात वर्ष डेट केल्यानंतर लग्न
नयनतारा आणि विग्नेश शिवन गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ‘नानुम राऊडीधन’ या चित्रपटामध्ये काम करत असताना हे दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. हा चित्रपट विग्नेश दिग्दर्शित करत होता. 2021 मध्ये त्यांनी साखरपुडाही उरकून घेतला होता.


























































