ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईने ड्रग्ज लिंक प्रकरणात आणखी एकाला अटक केली. जय मढोक असे त्याचे नाव आहे. तो दृग्ज पुरवत असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. ड्रग्ज प्रकरणात ही 22 वी अटक आहे.

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी एनसीबी तपास करत आहे. एनसीबीने तपास करून अभिनेत्री रिया चक्रवती, शोविक चक्रवती, सॅम्युअल मिरांडा यांच्या 20 जणांना अटक केली होती. अटकेत असलेल्या काहींच्या चौकशीत जयचे नाव समोर आले.

तो कोकेन आणि हशिश पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्या बाबतची माहिती एनसीबीला मिळाली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने जयला अटक केली. जय हा दोघांना ड्रग्ज देत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. तो कोणाकडून ड्रग्ज घेऊन कोणाला देत असायचा याचा तपास एनसीबी करणार आहे.