करण जोहर यांना एनसीबीची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिग्दर्शक करण जोहर यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने नोटीस पाठवली आहे. त्या नोटिसीला येत्या शनिवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. नेमकी ती पार्टी कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. मंजिंदर सिरसाच्या तक्रारीवरून एनसीबीने तपास सुरू केला आहे.

एनसीबीने दिग्दर्शक करण जोहर यांना नोटीस पाठवली आहे. त्या पार्टीमधला व्हिडीओ नेमके कोणते इलेक्ट्रॉनिक डिवाइस वापरून शूट केला गेला, पार्टीला आलेल्या अभिनेते आणि अभिनेत्रींना कोणी बोलावले होते याची माहिती एनसीबीला हवी आहे. त्यासाठी एनसीबीने  करण जोहरला नोटीस पाठवली आहे. नोटिसीला उत्तर देण्यासाठी करण जोहर याना स्वतः येण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या वतीने त्याचा प्रतिनिधीदेखील ते पाठवू शकतात असे एनसीबीचे म्हणणे आहे.