राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले.