
सामना प्रतिनिधी । पाटोदा
लोकसभा निवडणूक ही ताकदीने लढवायची आहे आणि जिकांयची पण आहे. आमच्या पक्षाने सामान्य कुटुंबातील माणसाला उमेदवारी दिल्यामुळे काही जण आमच्यावर टीका करतात की, आम्ही ‘मॅच फिक्सींग’ केली. परंतु त्यांना सांगायचे आहे की, आमची ‘मॅच फिक्सींग’ केली नसून ‘मॅच विनिंग’ खेळी होणार आहे. पाटोदा येथील तालुका बुथ कमिटी सदस्य व कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश सोंळके,माजी आमदार अमरसिह पंडित, सय्यद सलीम,बाळासाहेब आजबे,सतिष शिंदे, रा.काँ जिल्हाअध्यक्ष तथा लोकसभा उमेद्वार बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.


























































