कडकनाथ कोंबडय़ा मागे लागतील तेव्हा सदाभाऊ खोत यांना कळेल, पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रावादी काँग्रेसने ’कडक’ शब्दात समाचार घेतला. शरद पवार यांनी भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले पण खोतांनी तर कडकनाथ कोंबडयांचा व्यवसाय सुरू केला आणि त्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक केली. कडकनाथ कोंबडया तुमच्या मागे लागल्या की तुम्हाला कळेल असा सणसणीत टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मारला.

हसन मुश्रीफ यांनी अतिशय बोचऱ्या शब्दात खोत यांचा समाचार घेतला. शरद पवारांनी वडीलकीच्या नात्याने सचिनला सल्ला दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या टीका करताना सदभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी होती. शरद पवार यांनी खेळांवर प्रेम केले आहे. त्यांनी आयपीएल स्पर्धा सुरू केल्यामुळे आज ग्रामीण भागातील आणि छोटया शहरांतील कतृत्वाला संधी मिळत आहे. क्रिकेटपटूंना आता निवृत्तीनंतर मोठं मानधन मिळत आहे. ही योजनाही शरद पवार यांच्यामुळेच सुरु झाली होती याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.