राष्ट्रवादीला खिंडार, रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर?

2024

नुकतंच भाजपमध्ये मोठी मेगाभरती झाली असून राष्ट्रवादी पक्षातील मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले होते. त्यात सातार्‍याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, पिचड पिता पुत्र, गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक या नेत्यांचा समावेश होता. आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार रामराजे निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.

या बाबत टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. निंबाळकरांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार रामराजे निंबाळकर आणि सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यात वादामुळे ते पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत.  तसेच विधान परिषदेचे सभापतीपद त्यांना राखायचे आहे. तत्पूर्वी उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर काँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे यांनी पक्षाला रामराम केला. आता ते भाजप सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या