पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.

नगरपंचायत निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीला सात, शिवसेनेला सहा, शहर विकास आघाडी दोन, भाजपला एक तर अपक्ष एक असे बलाबल झाल्याने पारनेर नगरपंचायतीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात सदस्यांसह शहर विकास आघाडीच्या दोन सहयोगी सदस्यांची एकत्रित गटनोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याने नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.