
पुण्यातील आयकर कार्यालयाची माहिती घेण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या हाय हाय अशी घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला.
सॅलिसबरी पार्क येथील आयकर भवन कार्यालयात कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती घेण्यासाठी सोमय्या आले होत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत घोषणाबाजी करत पुढे आले. तिथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांबरोबर त्यांची बाचाबाची झाली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.























































