तृप्ती देसाईंचे आरोप कपोलकल्पित – नीलम गोऱ्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथील एका हॉटेलमध्ये भोंदूबाबा अशोक खरात याची भेट घेतल्याचा तृप्ती देसाई यांचा आरोप डॉ. नीलम गोऱ्हे यांनी फेटाळून लावला आहे. हे सर्व आरोप ‘कपोलकल्पित’ आणि आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी रचलेले ‘षडयंत्र’आहे, असे त्या म्हणाल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गेल्या पाच दशकांत मी कधीही कोणत्याही ढोंगी बुवा किंवा गुरूच्या दर्शनाला गेलेली नाही. माझी अढळ श्रद्धा केवळ देवदेवता, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, साईबाबा आणि दत्त महाराजांवर आहे. मंत्रिपद मिळवण्यासाठी मला कधीही तांत्रिक गुरूची गरज भासली नाही.