डायमंड लीगमध्ये नीरजला सिल्व्हर, सलग सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न भंगले

हिंदुस्थानचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने प्रतिष्ठsच्या डायमंड लीग स्पर्धेतील भालाफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर उशिरा अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या या स्पर्धेत नीरजने दुसऱया प्रयत्नात 83.80 मीटर फेकलेला भाला त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली.

या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेच याने 84.24 मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर फिनलंडचा ऑलिव्हर हेलँडर 83.74 मीटर कामगिरीसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून त्याच्या लौकिकास साजेशी कामगिरी झाली नाही. फक्त दुसऱया प्रयत्नाने त्याला रौप्यपदक मिळवून दिले. जाकुब वडलेचने पहिल्याच प्रयत्नात 84.1 मीटर अंतर गाठून जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, यानंतर त्याने सहाव्या प्रयत्नात 84.27 मीटर अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला.

नीरजचा पहिला प्रयत्न फाऊल गेला. दुसऱया प्रयत्नात त्याने 83.80 मीटर अंतरावर भाला फेकत दुसऱया क्रमांकावर झेप घेतली. हीच कामगिरी त्याच्या रुपेरी यशासाठी पुरेशी ठरली.

नीरजची सुमार कामगिरी

नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली होती. दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 88.67 मीटर अंतर पूर्ण केले होते. याशिवाय त्याने लॉसने डायमंड लीगमध्ये 87.66 मीटर भाला फेकला होता. झुरीचमधील डायमंड लीगमध्ये 85.71 मीटर फेकून नीरज रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. आजच्या यूजीन डायमंड लीगमध्येही नीरजला रौप्यपदक मिळाले असले तरी अंतिम फेरीत त्याचा स्कोअर 83.80 मीटर होता.  नीरजच्या दृष्टीने ही कामगिरी सुमारच म्हणावी लागेल. खरं तर नीरजला या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधीदेखील होती, मात्र तसे घडू शकले नाही.