महाराष्ट्रातील 80 हजार विद्यार्थ्यांची ‘नीट’ परीक्षेत विजयी पताका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) महाराष्ट्रातील सुमारे 80 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत देशामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 13.66 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील 7.7 लाखांवर विद्यार्थी एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

गेल्या शुक्रवारी ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालामध्ये मुलींची बाजी मारली. 4.27 लाख मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या तर उत्तीर्ण मुलांची संख्या 3.43 लाख इतकी राहिली. चार तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनीही ही परीक्षा दिली होती. त्यातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या 13 सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

गेल्या वर्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अधिनियम 2019 हा संसदेत मंजूर झाला. त्यामुळे यंदापासून ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या 13 शाखा तसेच पुडुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेतील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’मधील गुणांच्या आधारावरच प्रवेश दिला जाणार आहे.

राज्य उत्तीर्ण विद्यार्थी

  • उत्तर प्रदेश 88889
  • महाराष्ट्र 79974
  • राजस्थान 65758
  • केरळ 59404
  • कर्नाटक 55009
  • दिल्ली 23554
  • हरियाणा 22395