
सामना ऑनलाईन, नांदेड
राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेशपूर्व परिक्षा ‘ NEET 2019’ मध्ये आयडियल इन्स्टीट्यूट ऑफ बायोलॉजी अर्थात IIB च्या विद्यार्थ्यांनी यशाची कमान आणखी उंचावली आहे. गेल्यावर्षी झालेल्या नीट परिक्षेत आयआयबीच्या 1,111 विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाला होता तर कृष्णा अग्रवाल हा देशात सातवा आला होता. या वर्षी झालेल्या नीट परिक्षेत IIB ची कृष्णाई राठोड देशात पहिली आली आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीची प्रवेशपूर्व परिक्षा 5 मे 2019 रोजी घेण्यात आली होती. नुकताच या परिक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून त्यात आयआयबीची विद्यार्थिनी कृष्णाई कल्याण राठोड ही बायोलॉजी विषयात 360 पैकी 350 गुण मिळवत भारतात अव्वल ठरली आहे. तर एमएचटी-सीईटी 2019 मध्ये ऋचा ओमप्रकाश पालकृतवार ही विद्यार्थिनी महाराष्ट्रात अव्वल ठरली. या दोघांचा सत्कार आयआयबीचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. नीट-2019 मधील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे आयआयबी टीमच्या सांघिक परिश्रमाचे फळ आहे असे उद्गार दशरथ पाटील यांनी यावेळी काढले.
‘नीट’सोबतच IIB बारावीच्या आणि एमएचटी-सीईटी, एम्स, जीपमर अशा अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी या विषयाचे मार्गदर्शन करते. गेल्या दोन दशकांपेक्षाही अधिक काळापासून गुणवत्तेच्या बळावर आयआयबीने यशाचे एकेक शिखर सर केले आहे. नीट-2019 मध्ये कृष्णाई बायोलॉजी विषयात भारतात अव्वल ठरल्याने आयआयबीचे या क्षेत्रातल्या अभ्यासकांकडून कौतुक होत आहे. निकालांमध्ये IIB च्या विद्यार्थ्यांनी सातत्य कायम ठेवले आहे ही महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब आहे.
एमबीबीएस वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत एकुण 720 पैकी 360 गुण बायोलॉजी या विषयासाठी निर्धारित आहेत. त्यामुळे एकट्या बायोलॉजी या विषयाला परीक्षेमध्ये 50 टक्के महत्व आहे. नीट -2019 मध्ये आयआयबीच्या 75 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण मिळवले तर 700 विद्यार्थ्यांनी एकट्या बायोलॉजी विषयामध्ये 300 पेक्षा जास्त गुणांचा पल्ला ओलांडला आहे.
आयआयबीचे नीट टॉपर्स
यावर्षी झालेल्या नीट-2019 परीक्षेमध्ये आयआयबीच्या 75 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण घेऊन विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये कृष्णाई राठोड (676) प्रथमेश रोकडे (675), अनंत मालपाणी (665), वेदांत पाटील (654), महेश काळे (654), शौनक गायकवाड (651), शिवम भुरे (650), इशा कदम (650), आफरा पटेल (645), ऋचा पालकृतवार (645), तनिष्क शहा (643), ऋषिकेश धुमाळ (642), मेहुल अग्रवाल (640), निखिल जाधव (640), आभा मंठाळकर (638), अभंग आदर्श (636), आदित्य कवुटगे (636), साक्षी गव्हाणे (631), पुनम नरवाडे (631), सुबोध रणेर (631), शुभम परडे (630), आदेश निकम (629), गार्गी रेखावार (627), ऋषिकेश कराड (627), संकेत जायभाये (625), जीवन उंडे (624), ऋत्विक केंद्रे (624), श्रेयश देशकर (622), वेष्णवी चौधरी (622), तुषार माने (621), मधूर बजाज (620), संकेत सिध्देवाड (620), ऐश्वर्या गुलाणेकर (620) यांचा समावेश आहे.
आयआयबीचे बायोलॉजी टॉपर्स
आयआयबीच्या 700 विद्यार्थ्यांनी यावर्षी झालेल्या नीट -2019 परीक्षेत बायोलॉजी विषयामध्ये 300 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. यामध्ये कृष्णाई राठोड (350), गणेश कोंडावार (346), वेदांत पाटील (345), आशय येगीनवार (345), तनिष्क शहा (343), सदानंत बर्डे (341), मानसी सूर्यवंशी (341), शिवम भुरे (340), विष्णुकांत पाटील (340), रोहन चव्हाण (340), चैतनय मंदारे (338), बस्वराज पाटील (337), संकेत वाघोळे (337), प्रीती वाकचावरे (337), ऋषिकेश धुमाळ (336), साक्षी गव्हाणे (336), आदित्य कौडगे (336), प्रथमेश रोकडे (335), अनंत मालपाणी (335), ईशा कदम (335), आदेश निकम (335), गार्गी रेखावार (335), यज्ञेय खडकेकर (335), अजिंक्य कराड (335), प्रेम गिल्डा (335), ऋतुजा ठिकाणे (335), विजय मोहिते (335), श्रीराम इंगोले (335), चैतन्य बरडे (335), शुभम जाधव (335), आकांक्षा पडलवार (335), वैष्णवी चौधरी (334), विवेक संकद (334), गौरव होले (333), शौनक गायकवाड (332), नयन जगदाळे (332), मोहिनी मंगे (331), सिध्देश कवटीकवार (331), वर्षा गाढवे (331), पायल पखारे (331), निखिलकुमार राऊत (331), सुमित देशमुख (331), स्वप्नील जिलकरवार (331), संजीवनी बस्वदे (331), श्रीनिवास पांचाळ (331), आणि आशिष मदनुरे (331) आदींचा समावेश आहे.






























































